‘एड्‌स’मध्ये फलदायी ओजक्षय उपचार

0
738

–   डॉ. मनाली महेश पवार
(गणेशपुरी, म्हापसा – गोवा)

साधारण ५ कोटी लोक एड्‌सचे बळी ठरले आहेत असा अंदाज आहे. अजूनही एड्‌सवर तसा इलाज सापडलेला नाही. ‘एड्‌स’चे निदान झाल्यावर रुग्ण प्रथम मनातून खचतो व आता मृत्यू अटळ आहे या जाणिवेनेच मृत्यूला जवळ आणतो.

दरवर्षी १ डिसेंबर हा ‘जागतिक एड्‌स दिवस’ म्हणून पाळला जातो. जगभर पसरलेल्या ‘एड्‌स’ या जीवघेण्या रोगाबद्दल सर्वांना माहिती किंवा ज्ञान असावे हे उद्दिष्ट. ‘एड्‌स’ म्हणजे एच.आय.व्ही. (कखत) या विषाणूच्या संसर्गाने होणारी एक स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निकामी बनते. एड्‌स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. एच.आय.व्ही. रक्तातील रोगप्रतिकारक पेशी लिम्फोसाईट्‌सवर आक्रमण करतात. एडस् पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होऊ लागते. वारंवार सर्दी, खोकला किंवा क्षयरोगासारखे भयंकर रोग होणे शक्य होते. एच.आय.व्ही. संसर्गापासून एड्‌स होईपर्यंत ८ ते १० वर्षांपेक्षाही अधिक काळ जाऊ शकतो. एच.आय.व्ही.ने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणाशिवाय राहू शकते.

एड्‌स वर्तमानकाळातील सर्वांत मोठ्या स्वास्थ्य समस्यांपैकी एक आहे. भारतासारख्या देशात जिथे नात्यांना महत्त्व आहे, उत्तम संस्कृती आहे, तिथेसुद्धा एड्‌ससारख्या व्याधींची मोठी संख्या असावी हे आपले दुर्धाग्यच म्हणावे. एड्‌सच्या संसर्गाची तीन मुख्य कारणे आहेत- ‘असुरक्षित लैंेगिक संबंधातून’, ‘बाधित रक्तातून’ तसेच ‘बाधित आईकडून गर्भाला.’
एच.आय.व्ही. विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील खास प्रजातीच्या माकडात सापडला आणि तेथूनच सगळ्या जगात पसरला असे मानले जाते. साधारण ५ कोटी लोक एड्‌सचे बळी ठरले आहेत असा अंदाज आहे. अजूनही एड्‌सवर तसा इलाज सापडलेला नाही. ‘एड्‌स’चे निदान झाल्यावर रुग्ण प्रथम मनातून खचतो व आता मृत्यू अटळ आहे या जाणिवेनेच मृत्यूला जवळ आणतो.
एड्‌स यांपैकी कोणत्याही कारणाने पसरू शकतो.
– असुरक्षित लैंगिक संबंध
– दूषित रक्त चढविल्याने
– संसर्गित आईकडून गर्भाला
– बाधित आईकडून स्तनपान करणार्‍या मुलाला
– दूषित सुईतून

एड्‌सची लक्षणे
– एच.आय.व्ही.चा संसर्ग झाल्यानंतर बहुतेक रोग्यांत बरेच दिवस कोणतेही लक्षण दिसून येत नाही. दीर्घकाळापर्यंत विषाणू वैद्यकीय चाचण्यांमध्येही दिसून येत नाही.

इतर लक्षणे
– डोकेदुखी
– थकवा
– मळमळ आणि भूक कमी लागणे
– वजन कमी होणे (६ महिन्यात १० किलोपेक्षा जास्त वजन अचानक कमी होणे)
– वारंवार तोंड येणे
– वारंवार जुलाब होणे
– वारंवार आजारी पडणे
ही सर्व लक्षणे सर्वसाधारण भासत असल्याने एड्‌सचे आक्रमण निश्‍चित ओळखता येत नाही.

एच.आय.व्ही.
हा विषाणू प्रतिरक्षा प्रणालीमध्ये ‘टी’ सेलवर हल्ला करतो. त्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत- सौम्य ताप, डोकेदुखी, थकवा, स्नायूवेदना, घसा, काखेतील किंवा जांघेतील सजू. ही लक्षणे काही आठवड्यांपर्यंत टिकतात आणि नंतर बर्‍याच वर्षांपर्यंत एच.आय.व्ही. संक्रमित लक्षणे आढळत नाहीत. याच कारणास्तव एच.आय.व्ही. संक्रमित आहे किंवा नाही हे प्र्रयोगशाळेच्या तपासणीशिवाय ओळखणे कठीण आहे.
एड्‌स
एड्‌स हा एक सिड्रोम आहे, जो एच.आय.व्ही. संसर्गाच्या प्रगत अवस्थेत दिसून येतो.
हे एच.आय.व्ही. मानव प्रणालीतील हेल्पर टी सेक्स (विशेषतः सीडी ४ + टी पेशी), मॅक्रोफेज आणि डेडराइट्‌न सेलमधील महत्त्वाच्या पेशींवर संक्रमित करते.
सी. डी. ४ + टी पेशी या पांढर्‍या रक्तपेशी असतात, ज्या प्रतिरक्षा प्रणालीच्या आवश्यक भाग असतात. सीडी ४ सेल्स सीडी ८ पेशींना सिग्नल पाठवतात आणि सीडी ८ सेल नष्ट करतात आणि संक्रमण किंवा व्हायरसला मारतात. जेव्हा सीडी ४ पेशींची संख्या प्रमाणापेक्षा कमी म्हणजेच गंभररीत्या खाली येते तेव्हा प्रतिकारशक्तीचा र्‍हास होतो. म्हणजेच व्याधीक्षमत्व कमी होते व शरीर लगेच संक्रमिक होते.

आयुर्वेग शास्त्राप्रमाणे ‘एच.आय.व्ही.’ संक्रमण किंवा ‘एड्‌स’ म्हणजेच ओजक्षय किंवा ओजाची विकृती म्हणाल येईल. पर ओजावर माणसाचे प्रत्यक्ष जीवनच व जीवनाची सर्वांगीण स्वास्थ्यावस्था अवलंबून असते. म्हणून अभ्यासकाच्या मते सध्या बहुचर्चित एड्‌स आजारात ओजोविकृतीची काही लक्षणे दिसतात.

सर्व धातूंचे सार, तेजोबूत आग, विशुद्ध, प्रसन्न, गुणवान असा जो आवपदार्थ तो म्हणजे ओज. शरीराचे बल, व्याधिप्रतिकारक्षमता उत्तम राखण्यासाठी ओज घटकांचे महत्त्व निर्विवाद आहे. ओज कल्पना हे आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे.

रसापासून शुक्रापर्यंतच्या सर्व सातही धातूंचे ओज हे श्रेष्ठ सार आहे. आपण सेवन केलेल्या अन्नावर प्रथम जाठराग्नीचे आणि धातुस्तरावर प्रत्येक धातूग्नीचे संस्कार होत जातात; त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मालिन्य दूर होत, शुक्र धातू हा तप्त सुवर्णाप्रमाणे निर्मल तयार होतो. दुधाच्या प्रत्येक बिंदूत ज्याप्रमाणे धृताचा अंश असतो, त्याप्रमाणे शुक्राच्या प्रत्येक बिंदूत ओजाचा अंश असतो.

शरीरामधील सर्व धातू, अवयव, इंद्रिय यामध्ये ओज स्थित असते. पर (श्रेष्ठ) ओज हे हृदयात तर अपर ओज धमनी व सर्वदेह व्याफ, सर्व शेप धातूमध्ये असते.
ओज म्हणजे श्‍लेष्मा (शरीरातील द्रवीय पदार्थ).

असे हे ओज सर्व धातूंचे जलीय सार आहे. हृदयात असलेल्या पर ओजाचे प्रमाण ८ बिंदू सांगितले आहेत. त्यांचा नाश झाल्यास तात्काळ मृत्यू येतो व अपर ओजाचे प्रमाण १/२ अंजली सांगितलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘एड्‌स’ हा रोग नुसत्या स्पर्शाने पसरत नाही तर त्यासाठी दोन जलीय घटकांची देवाण-घेवाण व्हावी लागते. जसे की श्‍लेष्मा, रक्त, वीर्य आदी ओज हे द्रवीय असल्याने एड्‌सग्र्रस्त मनुष्याकडून या प्रकारे संक्रमण होऊ शकते.
ओज हे सौम्य द्रव्य आहे. हे कफाप्रमाणे प्रसन्न, शुद्ध, स्वच्छ, शुक्ल इषत् रक्तपीत वर्णयुक्त, घृतासमान, श्‍वेताभ पीतवर्ण, मधूप्रमाणे मधुरस, गंध असणारे आहे.

ओजाची कार्ये
– बल – ओजाचे प्रधान कर्म
– देहस्थिती- शरीर टिकवून ठेवण्याची प्रक्रिया
– प्राणायतन – प्राण किंवा जीवनशक्तीला आधार देण्याचे काम
– प्रीणन – प्रफुल्लितपणा टिकून ठेवणे
– ओजोविकृतीची लक्षणे ही बर्‍यापैकी एड्‌स लक्षणांशी सार्धम्य आहेत.
ओजोव्यापत् – प्रकुपित दोषामुळे किंवा दुष्ट दोष – दूष्य संसर्गामुळे, स्तब्धगुरुगात्रता, वातशोफ, वर्णभेद, ग्लानी, तंद्रा, निद्रा अशी लक्षणे आढळतात.
– ओजोविस्त्रंस – अपर ओजाच्या विक्षेपणात अडथळा उत्पन्न झाल्याने संधीविश्‍लेवो गासाणां सदनं, दोषच्यवन क्रियाऽसन्निरोधः
– ओजक्षय ः अपर ओजक्षयोन बियंति, (सारखी भीती वाटणे).
– दुर्बलो अगीक्ष्ण (वजनमध्ये घट, शक्तीचा र्‍हास, थकवा)
-व्यथितेन्द्रिय (इंद्रिये दौर्बल्य)
– दुर्मन ः (मन उदासिन होणे, सारखे दुःखी होणे)
– रुक्ष ः (शरीराची शांती नाहीशी होणे)
पर ओजक्षयामुळे
-मूर्च्छा
– मांसक्षयो (प्रकर्षाने वजन कमी होणे, बारीक होणे)
– मोह
– प्रलाप (सतत बडबड)
– मरणम्
ही सगळी लक्षणे व्याधीक्षमत कमी झाल्याने दिसून येतात व सर्व लक्षणे ‘एड्‌स’प्रमाणेच आहेत.
ओजक्षयाची कारणे
अनशनं, चिन्ता, रुक्ष, अल्प प्रमिलाशनम्, वात, भय, शोको, रुक्षपानं, प्रजागर, कालो, भूतोपघात, व्यायामो, कफशोणित शुकानामलानांच ईतवर्तनम्.

ओजोवितृतीमधील उपचार
अनिर्बंध खाण्या-पिण्याच्या सवयी, वागण्याच्या सवयी, ताण-तणाव, हवा, अन्न, पाणी यांचे वाढते प्रदूषण, हिंसाचार, कामोद्रेक यांचा एकत्रित परिणाम म्हणून माणसाची व्याधीक्षमता कमी होते व ते टिकवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या सद्वृत्तांचे पालन करणे हा ‘एड्‌स’ रोगांवरील महत्त्वाचा उपचार आहे.

व्याधिक्षमत्व टिकवण्यासाठी म्हणूनच एड्‌समध्ये रसायन चिकित्सा सांगितली आहे. यामध्ये च्यवनप्राश रसायन, आमलकी रसायन, सुवर्णसिद्ध जल याचा दररोज वापर, सेवन रुग्णांनी करावे.
– शतावरी अश्‍वगंधासिद्ध दूध प्यावे
– गुडूचीसारख्या रसायनाचे निरंतन सेवन करावे.
– रसायनांद्वारे थोडी बलप्राप्ती झाल्यावर शरीरातील विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स) बाहेर काढण्यासाठी मृदू शोधनाचा वापर करावा. त्यासाठी स्नेह स्वेदादी पंचकर्मद्वार मृदु विरेचन, बस्ती इत्यादी द्यावे. रुग्णाला बलानुसार रक्तमोक्षण करावे.
– रक्तशुद्धीसाठी यकृतावर कार्य करणारी द्रव्ये. उदा. कालमेधसारख्या द्रव्याचा वापर करावा.
– सार्वदेहीक चिकित्सेबरोबर लक्षणानुरुप चिकित्सा द्यावी.
– अतिसारामध्ये संजीवनी वटी, कुटजहान वटी
– तापामध्ये संशमनी वटी, षडंग पाणी, त्रिभुवनर्कीती रस
– खोकल्यामध्ये सितोपलादी चूर्ण, लक्ष्मीविलन
– त्वचाकडूंमध्ये हरिद्राखण्ड, खदिराष्टीष्ट
– लासिका ग्रंथी शोधामध्ये काचनार गुग्गुळ
– अरुचीमध्ये हिंग्वापटक चूर्ण, लशूनादिवटी
– मुखपालामध्ये त्रिफलाच्या काट्याने गण्डूम
– व बल वाढवण्यासाठी अश्‍वगंधा, आमलक रसायन.
ही सगळी औषधे योग्य वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
एड्‌स किंवा ओजक्षयात उपयोगी येणारी द्रव्य.
– आमलकी, हरिद्रा, गुडूची, यष्टीमधू, पिप्पली, शतावरी, अश्‍वगंधा, हरितकी, तुळस, द्राक्ष व सुवर्ण.
घ्यावयाची काळजी
– आहार साधा पचणारा असावा. चमचमीत तेलकट पित्तक मसालेधार पदार्थांचे सेवन थांबवणे. सकाळचा नाश्ता गरम व ताजा असावा. दुपारचे जेवण वरण- भात, तूप, लिंबू, आमटी, भाजी, पपई, भाकरी, उसळी, चटणी असे असावे.
– रोज एक चमचा चवनप्राश घ्यावे.
– कफभर दुधात चिमूटभर सुठं पुड व चार वावडिंगाचे दाणे टाकून दूध उकळावे.
– रात्रभर पाण्यात भिजवलेले दोन-तीन बदाम सकाळी खावे.
– वेळच्यावेळी झोपावे, रात्री जागरण करू नये.
– रात्री झोपताना सर्वांगाला तेलाने मालिश करावे.
– अर्ध्या शक्तीनुसार आपल्याला जमेल तेवढा व्यायाम करावा.
– भावना उद्धापित होतील असे आचरण टाळावे.
– योग साधनेचा अवलंब करावा.
थोडक्यात एड्‌स रुग्णांनी तसेच एड्‌स होऊ नये याकरिता योग, दुग्ध- घृत पान, अभ्यंग, सुवर्णसिद्ध जल, अभ्रक, प्रवाळ, मोती, शर्करा, आध्यात्मिक अनुष्ठान, ब्रह्मचर्य, स्वस्थवृत्तीचे पालन करावे.
एड्स रुग्णासाठी एआरटी ट्रीटमेंट हॉस्पिटलध्ये मोफत दिली जाते. त्याचाही लाभ घ्यावा.
एड्‌स स्पर्शाने पसरत नसल्याने रुग्णांना तुच्छ लेखू नये. मिसळून राहायला हरकत नाही. नेहमी वातावरण प्रसन्न ठेवावे.