- डॉ. प्रिया प्रभू
एमडी (पीएसएम), सहयोगी प्राध्यापक, जन औषधवैद्यक शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज. वीीिवशीहरिपवश2सारळश्र.लेा
‘एचएमपीव्ही’ हा 25 वर्षांपूर्वी सापडलेला 75 वर्षांपूर्वीचा एक सर्दीचा विषाणू आहे. यावर विशिष्ट उपचार उपलब्ध नसल्याने याची तपासणी करणे अत्यावश्यक नाही. सर्दीच्या विषाणूंमधील एक विषाणू केवळ चीनमध्ये आढळला म्हणून तो अचानक मोठा झाला आणि मीडियामधील सर्व बातम्यांचा हिरो झाला. या आजाराची भीती मनातून पूर्णपणे काढून टाकून आपली नेहमीची काळजी घेत राहणे, हेच योग्य आहे. विषाणूचे नाव मोठे आहे म्हणून हा विषाणू पण मोठा आहे असे नाही. एका ट्विटवरून सुरू झालेले हे वादळ जागतिक आरोग्य संघटनेच्या निवेदनानंतर आता थांबवण्यास हरकत नाही.
गेले काही दिवस सर्वत्र एकच चर्चा आहे. हचझत म्हणजे नवा ‘कोविड’ आहे की काय?
मीडिया ‘कोविड’काळाचा उल्लेख केल्याशिवाय याविषयी काहीही माहिती सांगत नाही. बऱ्याचदा बातमीचे शीर्षक आणि त्यातील माहिती ही पूर्णतः वेगळीही असू शकते. मात्र बरेच लोक केवळ बातमीचे शीर्षक वाचून लगेच मत बनवतात किंवा प्रतिक्रिया देतात. तसेच प्रत्येक बातमीमध्ये तज्ज्ञांचा उल्लेख असतो. पण हे तज्ज्ञ खरेच ‘एखाद्या आजाराच्या समाजातील प्रसाराविषयी बोलण्यासाठी प्रशिक्षित असतात का?’ याचा विचार कोणीही करत नाही.
ज्यावेळी ‘कोविड’ आला तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की त्यातून महासाथ निर्माण होईल. डअठड र्लेीं 1 हा विषाणू 2003 मध्ये जगात आला होता. त्यावेळी महासाथ येईल असे वाटले होते. मात्र जगभरात केवळ आठ हजारच्या आसपास केसेस झाल्या आणि डअठड र्लेीं 1 थांबवण्यात आपण यशस्वी झालो. मग 2019 मध्ये डअठड र्लेीं 2 म्हणजे ‘कोविड’ आला. चीनला आणि जगाला वाटले की दोन्ही विषाणूंमध्ये बरेच साम्य असल्याने हादेखील थांबवण्यात आपण यशस्वी होऊ. पण डअठड र्लेीं 1 आणि 2 (कोविड) या दोन्ही आजारांमध्ये एक मुख्य फरक होता. ‘कोविड’मध्ये लक्षणांची सुरुवात होण्यापूर्वी दोन दिवस संसर्ग इतरांपर्यंत पोहोचायचा. त्यामुळे रुग्ण आजारी पडण्यापूर्वीच नकळत इतरांना संसर्ग द्यायचे. अशा नकळत पसरू शकणाऱ्या आजाराला थांबवणे अवघड असल्याने ‘कोविड’ची महासाथ निर्माण झाली.
त्या अनुभवाने आता आपण थोडे शहाणे झालो आहोत आणि थोडे चिंतीतही झालो आहोत. चिंतीत झाल्यामुळे होतंय काय की ‘चीनमधील विषाणूजन्य आजार’ असे म्हटले की आपण त्याला घाबरतो तरी किंवा त्यावर चिडतो तरी. मात्र आज आपण चिंतीत न होता ‘कोविड’च्या महासाथीने शिकवलेल्या शहाणपणाच्या गोष्टी वापरून हचझत विषाणूबद्दल माहिती घेऊया.
- हचझत हा विषाणू ‘कोविड’ विषाणूसारखा आहे की वेगळा आहे?
- हचझत विषाणू ‘कोविड’ विषाणूपेक्षा अनेक प्रकारे वेगळा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो कधीच विसरायचा नाही, तो म्हणजे, हचझत हा एक जुना विषाणू आहे आणि ‘कोविड’ हा अगदी नूतन विषाणू होता. या एकाच मुद्द्याने खूप सारा फरक पडतो. कारण जो विषाणू जुना असतो त्याच्याविरुद्ध आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारकशक्ती उपलब्ध असते. हचझत कमीत कमी 75 वर्षे जुना विषाणू आहे. म्हणजे तो साधारण 1950 पासून जगभरातील सर्व देशांमध्ये आजार निर्माण करत होता. मात्र त्याची ओळख 25 वर्षांपूर्वी म्हणजे 2001 मध्ये पटली.
एखादा विषाणू जुना आहे का हे कसे ओळखायचे? - बरेचसे जुने विषाणू हे मुख्यतः लहान मुलांमध्येच आजार निर्माण करतात. कारण मोठ्या लोकांमध्ये त्याविरुद्ध भरपूर अँटिबॉडीज उपलब्ध असतात. हचझत देखील मुख्यतः लहान मुलांचा आजार आहे. मोठ्या वयोगटातील इम्युनिटी कमी असणाऱ्या व्यक्तींमध्येदेखील हा आजार दिसून येतो.
महासाथ तेव्हाच येते जेव्हा प्रत्येक वयोगटातील लोक त्या आजाराला बळी पडू शकतात. जसे ‘कोविड’च्या बाबतीत झाले होते. ‘कोविड’ होण्याची शक्यता घरातील सर्वांसाठी होती. तसे हचझतचे नाही. जर प्रत्येकाला हा आजार होणार नसेल तर मग महासाथ येण्याची शक्यता धूसर होते.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘कोविड’मध्ये 90% लोकांना लक्षणविहीन संसर्ग झाला होता. म्हणजे त्यांच्या शरीरात ‘कोविड’ विषाणू होता, पण त्यांना एकही लक्षण जाणवत नव्हते. मात्र असे लक्षणविहीन बाधित लोक आजार इतरांपर्यंत पोचवायचे. लक्षणे नसल्यामुळे त्या व्यक्तींना आपण इतरांपासून अंतर राखायला सांगू शकत नव्हतो.
हचझत चा संसर्ग झाला की सहसा काही ना काही लक्षण दिसते. मग ती साधी सर्दी व खोकला का असेना. संसर्ग झालेली व्यक्ती आजारी पडते. म्हणजे या आजाराचा नकळत फैलाव होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आपण सर्व हचझत आजारी व्यक्तींना इतरांपासून अंतर राखायला सांगून आजाराचा फैलाव थांबवू शकतो. या कारणानेदेखील महासाथ निर्माण होण्याची शक्यता नाही.
भारतात जे सहा रुग्ण सापडले आहेत, त्याहून कितीतरी जास्त बाधित व्यक्ती सर्वत्र असू शकतात. हा जुना विषाणू गेली 75 वर्षे भारतामध्ये असल्याने त्याचा आता 2024 मध्ये भारतात प्रवेश झाला असे म्हणता येणार नाही. हे सहा रुग्ण आंतरराष्ट्रीय प्रवासी नाहीत. ही भारतातच जन्मलेली छोटी बाळे किंवा मुले आहेत. यांना भारतातील विषाणूमुळेच बाधा झालेली आहे. भारतात विषाणू आधीच असेल आणि आतापर्यंत त्याची साथ आली नसेल तर मग भविष्यात महासाथ नक्की येणार नाही.
- हा जुना विषाणू असेल तर चीनमध्ये का वाढत आहे?
- चीन हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील एक समशीतोष्ण देश आहे. या देशामधील हिवाळा तीव्र असतो, त्यामुळे हिवाळ्याच्या कालावधीमध्ये श्वसनसंस्थेचे विविध आजार येथे वाढत्या प्रमाणात दिसून येतात.
या देशामध्ये हिवाळा सुरू होण्यापूर्वी सर्व लोकांना फ्लूची लस घ्यावी लागते. मात्र थंडीमुळे बंदिस्त असलेल्या घरांमध्ये तसेच तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी फिरवल्या जाणाऱ्या हवेमुळे श्वसनसंस्थेचे आजार वाढतात व फैलावतात. असे दर हिवाळ्यात होते. यासाठी विविध विषाणू कारणीभूत असतात. भारतात मात्र हिवाळ्यापूर्वी आपण अशी कोणती खास काळजी घेत नाही. कारण भारतातील घरे सहसा खिडक्यांची असल्याने मोकळी व हवेशीर असतात व त्यामुळे हिवाळ्यामध्ये श्वसनसंस्थेच्या आजारांचे उद्रेक होत नाहीत. चीनच्या ‘सीडीसी’ या संस्थेने फ्लूसारख्या आजाराच्या सर्वेक्षणामध्ये बदल करून अधिक चांगल्या प्रकारे सर्वेक्षण सुरू केले आहे. अशावेळीदेखील संख्येमध्ये वाढ जाणवते.
7 जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेने एक परिपत्रक जारी केले व त्यामध्ये याविषयी सर्व माहिती सविस्तरपणे सांगितली आहे. दर आठवड्याला चीनमधून ही आकडेवारी प्रसिद्ध केली जाते आणि त्या आकडेवारीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष ठेवले जाते. सध्या चीनमध्ये जेवढी रुग्णसंख्या आहे, ती गेल्या दोन वर्षांहून कमी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सध्या जे रुग्ण आढळून येत आहेत, त्यांतील सर्वाधिक रुग्णांना फ्लूचा संसर्ग झालेला आहे. सर्वच रुग्ण हे हचझत चे नाहीत. चीनमध्ये दिसणारी वाढीव रुग्णसंख्या ही सर्वप्रकारच्या विषाणूंमुळे आहे आणि केवळ हचझत यासाठी कारणीभूत आहे असे नाही. त्यामुळे हचझत ची वाढ झाली आहे हे फसवे विधान आहे. दरवर्षी हिवाळ्यामध्ये रुग्णांमध्ये जशी वाढ होते तशीच ही अपेक्षित वाढ आहे.
- जर हचझत गेली 75 वर्षे जगामध्ये व भारतामध्ये आहे तर याविषयी कोणाला जास्त माहिती का नाही?
- सर्दीसदृश्य लक्षणे निर्माण करणाऱ्या विषाणूंच्या गटातील हचझत हा एक विषाणू आहे. जेव्हा आपल्याला सर्दी किंवा खोकला अशी लक्षणे असतात तेव्हा 10-15% रुग्णांमध्ये हचझत विषाणूची बाधा असू शकते. जर आपण निमोनियाचे रुग्ण बघितले तर अशा रुग्णांमध्ये साधारण 10% हचझत ची बाधा असू शकते. हे प्रमाण निश्चितच जास्त नाही.
विषाणूजन्य आजारांसाठी स्वतंत्र उपचार सहसा नसतात. सर्दी-खोकला झाल्यावर आपण विषाणूविरोधी औषधे घेत नाही. विश्रांती घेणे, लक्षणांनुरूप औषधे घेणे, भरपूर द्रवपदार्थ घेणे, अशा उपायांनी विषाणूजन्य आजार बरे होतात. जर विषाणू कोणता हे ओळखून स्वतंत्र उपचार द्यायचे नसेल तर विषाणूचा प्रकार ओळखण्याचे काही खास कारण नसते. मात्र फ्लूच्या आजारावर आपल्याला सतत लक्ष ठेवणे आवश्यक असल्याने बऱ्याचदा फ्लूची तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे कधीकधी एकाहून अधिक विषाणूंची बाधा एकाच वेळी झालेली आहे का, हे तपासण्यासाठीदेखील टेस्ट केली जाते. ज्या ठिकाणी तपासणी करताना सर्व विषाणूंची एकत्रित तपासणी होते, अशा ठिकाणी हचझत विषाणूबाबतदेखील काही आकडेवारी उपलब्ध असेल. त्यामुळे या विषाणूची माहिती डॉक्टरांना असली तरीदेखील याविषयी स्वतंत्र जनजागृती करण्याचे कोणतेही कारण नाही. ना याची लक्षणे वेगळी आहेत, ना याचे उपचार वेगळे आहेत, ना याचे प्रतिबंधन वेगळे आहे.
- हचझत ची लक्षणे आहेत तरी कोणती? तसेच यापासून कितपत धोका आहे?
- हा आजार शक्यतो लहान मुलांमध्ये होत असल्याने बाळाला किंवा मुलांना ताप येऊ शकतो. त्यांचे नाक चोंदू शकते. त्यांना खोकला होऊ शकतो. जर संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहोचला तर त्यांना धाप लागू शकते. निमोनियाची इतर लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे तर प्रत्येक सर्दी-खोकल्यामध्येही दिसतात. त्यामुळे निव्वळ लक्षणांवरून नक्की कोणत्या विषाणूची बाधा झाली आहे हे समजणे अवघड आहे आणि याची तपासणी केल्याने उपचारामध्ये फरक पडणार नसल्याने प्रत्येक रुग्णाची चाचणी करणेदेखील अप्रस्तुत आहे.
जी बाळे कुपोषित आहेत व ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, तसेच ज्यांच्या कुटुंबीयांनी स्वतःला सर्दी-खोकला असताना कोणतीही काळजी घेतली नसेल तर अशावेळी मोठा संसर्ग झाल्याने अशी बाळे निमोनियासारख्या गुंतागुंतीला सामोरी जातात.
विषाणू कोणताही असो, जेव्हा मुलांना सर्दी-खोकल्यासारखे आजार होतात, त्यावेळेला त्याचे रूपांतर ‘निमोनिया’मध्ये होत नाही ना, यावर लक्ष ठेवायला हवे. यासाठी मुलांच्या श्वासोच्छ्वासावर लक्ष ठेवावे. जर श्वासोच्छ्वास तीव्र गतीने होत असेल तर अशावेळी मुलाला तातडीने रुग्णालयामध्ये घेऊन जावे. हचझत मध्ये रुग्ण जर गंभीर झाला तर मृत्यूचा धोका अधिक म्हणजे 10-12 % एवढा असतो.
मात्र आपण जर सर्वसाधारण चित्र बघितले तर इतर सर्दीच्या विषाणूंप्रमाणेच या आजाराची लक्षणे आहेत. तसेच ज्यांची इम्युनिटी चांगली आहे व ज्यांचे पोषण चांगले आहे, त्यांच्यामध्ये याचा धोका कमी असतो. वयाची पाच वर्षे होईपर्यंत जवळजवळ 90 % बालकांमध्ये याच्या अँटीबॉडीज आढळून येतात.
तसेच प्रौढ व्यक्तींमधील जवळजवळ 100% व्यक्तींमध्ये विषाणूविरुद्ध अँटीबॉडीज उपलब्ध असतात. ज्यांना-ज्यांना सर्दी-खोकल्यासारखी लक्षणे असतात त्यांनी नेहमीच लहान मुलांपासून अंतर राखावे हे उत्तम. म्हणजे मुलांचा धोका आपसूकच कमी होतो.
- हा आजार टाळण्यासाठी काय करता येईल?
- हा हिवाळ्याच्या शेवटच्या काळात बळावणारा आजार असल्याने या काळात सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. ज्यांना सर्दी-खोकल्याची लक्षणे आहेत, अशा मोठ्या व्यक्तींनी तसेच लहान मुलांनी इतरांपासून थोडे अंतर राखावे. शिंकताना व खोकताना तोंड झाकण्यासाठी हाताच्या दंडाचा वापर करावा. तसेच आपले हात सॅनिटायझरने स्वच्छ करावेत किंवा साबणाने धुवावेत. आजारी मुलांना शाळेत तसेच खेळण्यासाठी पाठवू नये. याखेरीज मुलांचे पोषण व्यवस्थित राहील याची काळजी घ्यावी. त्यांचे वजन कमी नाही ना हे तपासावे. जन्मलेल्या बाळांमध्येदेखील हचझत विरुद्ध अँटीबॉडीज सापडलेल्या आहेत. या बाळाच्या आईकडून बाळाला जन्मतः मिळालेल्या असतात. बाळाचे वय वाढत गेले की ही इम्युनिटी थोडी कमी होते व त्यानंतर त्यांना संसर्ग होऊ लागतो. म्हणून बाहेरून घरी आल्यानंतर साबण लावून हात धुणे, तसेच चेहऱ्याजवळ हात न नेणे, नाक व तोंडाला सतत स्पर्श न करणे, या छोट्या कृतीदेखील सुरक्षा अनेक पटीने वाढवतात. ज्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी स्वतः मास्क वापरल्यास इतर त्यातून सुरक्षित राहू शकतात.
स्तनपान करणाऱ्या बाळांना कमीत कमी दोन वर्षे आईचे दूध द्यायला हवे, जेणेकरून आईच्या दुधावाटे इम्युनिटी बाळांना मिळेल. तसेच सर्दी असताना नाक बंद झाल्यामुळे लहान बाळे योग्य रीतीने स्तनपान करू शकत नाहीत, याविषयी काळजी घ्यायला हवी.
ज्यांची इम्युनिटी कमी आहे किंवा ज्यांची फुफ्फुसे कमजोर आहेत किंवा ज्यांना इतर काही आजार आहेत अशा व्यक्तींनी बंदिस्त गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यास हरकत नाही. मास्कच्या सार्वत्रिक वापराची गरज नाही.
या सर्व माहितीवरून आता तुमच्या लक्षात आलेच असेल की, 25 वर्षांपूर्वी सापडलेला हा 75 वर्षांपूर्वीचा एक सर्दीचा विषाणू आहे. काही रुग्णांमध्ये हा विषाणू निमोनियासारखी लक्षणे निर्माण करतो. यावर विशिष्ट उपचार उपलब्ध नसल्याने याची तपासणी करणे अत्यावश्यक नाही. सर्दीच्या विषाणूंमधील एक विषाणू केवळ चीनमध्ये आढळला- रुग्ण सापडले- म्हणून अचानक मोठा झाला आणि मीडियामधील सर्व बातम्यांचा हिरो झाला.
मीडियातील बातम्यांच्या दबावाखाली रुग्णालयांची सज्जता व तज्ज्ञांचे टास्क फोर्स बनवण्याऐवजी गोव्यातील आरोग्य मंत्रालयाकडून या आजाराबाबत योग्य माहिती सांगणारे निवेदन प्रसारित केले गेले. या आजाराची भीती मनातून पूर्णपणे काढून टाकून आपली नेहमीची काळजी घेत राहणे, हेच योग्य आहे. विषाणूचे नाव मोठे आहे म्हणून हा विषाणू पण मोठा आहे असे नाही. एका ट्विटवरून सुरू झालेले हे वादळ जागतिक आरोग्य संघटनेच्या निवेदनानंतर आता थांबवण्यास हरकत नाही.