‘एक्यूआय’वर सुकाणू समितीची असेल देखरेख

0
7

राज्य सरकारच्या पर्यावरण हवामान बदल खात्याने हवेच्या गुणवत्तेवर (एक्यूआय) देखरेख ठेवण्यासाठी राज्य सुकाणू समिती नियुक्ती केली आहेत. एनजीटीने दिलेल्या निर्देशानुसार या सुकाणू समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. एनजीटीने हवा प्रदूषण नियंत्रणप्रश्नी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार राज्य कृती आराखडा तयार करण्यासाठी आणि मार्गदर्शक तत्त्वाच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी राज्य हवा गुणवत्ता देखरेख समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये पर्यावरण खात्याचे सचिव, नगरविकास, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिवांची या समितीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे.