एका घरासाठी एकच होम आयसोलेशन कीट दिला जाणार आहे. एका घरात एकापेक्षा जास्त कोरोना रुग्ण असतील तर त्याला फक्त अतिरिक्त औषधे दिली जातील. पोर्टलवर नोंदणी करू न शकणार्या कोरोना सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनासुद्धा होम आयसोलेशन कीट दिली जाणार आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल दिली. राणे यांनी तज्ज्ञ समितीच्या बैठकीत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही केली जाणार आहे. होम आयसोलेशन कीट वितरण सुरळीत करण्यासाठी डॅश बोर्ड तयार केला जात असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.
राज्यात आणखी चाचण्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. आरटीपीसीआर आणि ऍन्टीजन चाचण्यांचा समतोल राखला जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आलेल्या संशयित रुग्णासाठी सिटी स्कॅनची सक्ती केली जाणार आहे, असेही राणे यांनी म्हणाले.