राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोना चाचण्यांमध्ये घट झाली असून, नवीन केवळ ३० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच, आणखी एका कोरोना बळींची नोंद झाली आहे. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २.८२ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत केवळ १०६१ स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यातील ३० स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार १४१ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३७७४ एवढी झाली आहे. राज्यात मागील चोवीस तासांत आणखी २२१ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५८ टक्के एवढे आहे.