मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात काल आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. आफ्रिकेतून आणलेला सूरज नामक चित्त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळला. कुनो येथे गेल्या चार महिन्यांत आठ चित्ते मरण पावले आहेत, तर या आठवड्यात मरण पावलेला हा दुसरा चित्ता आहे.
सूरज चित्त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी मंगळवारी तेजस या नर चित्त्याचा मृत्यू झाला होता. मादी चितेसोबत झालेल्या हिंसक झुंजीत तो जखमी झाला आणि त्यामुळे त्याला जीव गमवावा लागला, असा दावा करण्यात आला होता.