मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी झटका दिला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना सेनेच्या नेते पदावरून हटवले आहे. उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी असलेले एक परिपत्रक जारी करत त्यांनी हा आदेश दिला आहे. पक्षाविरोधी कारवाई केल्याचे कारण देत, त्यांना सेनेच्या नेते पदावरून हटवले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आता विधिमंडळाचे नेते बनले आहेत. त्यामुळे त्यांचे एखादे छोटे पद गेले, तर त्यामध्ये कमीपणा काय, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.