भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिलेल्या एकनाथ खडसे यांनी काल शुक्रवारी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत रीतसर प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशासाठी एकनाथ खडसे गुरुवारीच हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यादेखील आहेत. रोहिणी खडसे यांनीही आपण भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना श्री. खडसे यांनी, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शरद पवार यांनी मला प्रवेश दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आयुष्यातली ४० वर्षे मी भाजपामध्ये काम केले. मात्र वारंवार माझी बदनामी झाली, छळ झाला. भाजपमध्ये माझ्यावर अन्याय झाला आहे असे बोलून दाखवले.