आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना ‘ऍम्नेस्टी इंटरनॅशनल’ ने अखेर भारतातून आपला गाशा गुंडाळला आहे. संस्थेची बँक खाती सरकारने गोठवलेली असल्याने आपले सर्व संशोधन प्रकल्प बंद पडल्याने हे पाऊल उचलावे लागत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
मानवाधिकार संस्थेविरुद्ध सूडबुद्धीने ही कारवाई केली गेल्याचा दावा ऍम्नेस्टीने केला. गेली दोन वर्षे संस्थेविरुद्ध सरकारने कारवाई चालवली होती.