ऊस उत्पादकांसाठीची अनुदान योजना आणखी पाच वर्षे वाढवा

0
5

>> ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद झाल्यानंतर गोवा सरकारने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांची विशेष अनुदान योजना सुरू केली होती ती आणखी पाच वर्षे वाढवण्यात यावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
संजीवनी सहकारी साखर कारखाना बंदच असून अजूनही तेथे कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. या परिस्थितीत गोवा सरकारची पाच वर्षांची विशेष अनुदानाची योजना संपल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होणार असून ते आर्थिक विवंचनेत सापडतील. त्यामुळे सरकारने ही विशेष अनुदान योजना आणखी पाच वर्षे चालू ठेवून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ह्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
पाच वर्षांची विशेष अनुदान योजना या वर्षी संपणार असून ती संपल्यानंतर ही योजना आणखी पाच वर्षांनी वाढवावी. अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
बंद पडलेल्या साखर कारखान्यात इथानॉलचे उत्पादन करण्यात येणार असल्याचे सरकारने शेतकऱ्यांना सांगितले होते पण ते अद्याप सुरू झालेले नाही.