ऊस उत्पादकांचे रास्ता रोको आंदोलन

0
5

दयानंदनगर-धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी ऊस उत्पादकांनी काल आंदोलन केले; मात्र सरकारकडून त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात असल्याने ऊस उत्पादकांनी महामार्ग रोको आंदोलन केले. पोलिसांनी महामार्ग बंद करणाऱ्या ऊस उत्पादकांना ताब्यात घेऊन महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला. राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून संजीवनी साखर कारखान्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जात आहे. संजीवनी कारखान्यात इथेनॉल उत्पादन सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सोमवारी सकाळी ऊस उत्पादकांनी कारखान्याच्या गेटसमोर आंदोलन करून कारखान्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. ऊस उत्पादकांनी महामार्ग रोखण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर, कारखान्याचे प्रशासक सतेज कामत, पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ऊस उत्पादकांच्या शिष्टमंडळाची चर्चा केली; मात्र ती निष्फळ ठरली.