ऊस उत्पादकांचे आंदोलन सुरुच

0
23

संजीवनी साखर कारखान्याजवळ सलग तिसऱ्या दिवशी ऊस उत्पादकांनी शांततेत धरणे आंदोलन सुरुच ठेवले आहे. त्या आंदोलनाला विविध संघटना आणि राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याने लवकरच आंदोलन पणजीतील आझाद मैदानावर सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. इथेनॉल प्रकल्पासंबंधी सरकारने अजूनपर्यंत ठोस धोरण स्पष्ट केले नसल्याने ऊस उत्पादकांनी मंगळवारपासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. विविध संघटनांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे ऊस उत्पादकांचा आत्मविश्वास वाढला आहे. सोमवारपासून आंदोलनाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.