ऊस उत्पादकांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

0
14

राज्य सरकारने संजीवनी साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाबाबत कोणतेही धोरण स्पष्ट न केल्यासंबंधी ऊस उत्पादकांनी सुरू केलेले आंदोलन काल बुधवारी दुसऱ्या दिवशीही शांतपणे सुरू होते.
काल बुधवारी ऊस उत्पादकांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये ऊस उत्पादक अध्यक्ष राजेंद्र देसाई, नरेश शिगावकर, फ्रान्सिस मास्कारेन्हस व अन्य ऊस उत्पादक उपस्थित होते.

दरम्यान, ऊस उत्पादकांनी धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर सांगे परिसरातील काहीजण संघटनेबद्दल सोशल मीडियावर अप्रचार करत असून त्यामुळे संतापलेल्या ऊस उत्पादकांनी संबंधितांनी कारखान्याजवळ येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे.
या संदर्भात यापूर्वी काही पोलीस स्थानकात रीतसर तक्रारी देण्यात आल्या होत्या. ऊस उत्पादकांनी मंगळवारपासून आंदोलन सुरू केल्यानंतर पुन्हा एकदा हा अपप्रचार केला जात असल्याचे ऊस उत्पादक आंदोलकांचे म्हणणे आहे.