उष्णतेच्या लाटेसंबंधी हवामान खात्याचे आवाहन

0
38

>> विविध उपाययोजनांची सूचना, तापमानात वाढ होण्याचा इशारा

गोवा सरकारच्या महसूल खात्याने भारतीय हवामान खात्याच्या मार्च ते मे २०२२ पर्यंतच्या उष्ण तापमानाच्या अंदाजानुसार गोवा राज्याला अत्यंत उष्ण हवामानाचा सामना करावा लागेल आणि कमाल तापमानात वाढ होईल असा इशारा दिला आहे. यावेळी उष्णतेच्या लाटेच्या सुरक्षिततेसाठी खात्याने विविध उपाय सूचवले आहेत. त्याचप्रमाणे या उष्णतेच्या दिवसांत काय करू नये यासंबंधीही काही सूचना दिल्या आहेत.

खात्याने सुचवलेल्या उपायानुसार तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी आणि शक्य तितक्या वेळा प्या. हलके वजनाचे, हलक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला. उन्हात बाहेर पडताना गॉगल, छत्री, टोपी, शूज किंवा चप्पल वापरा. प्रवासात पाणी सोबत ठेवा. बाहेर काम करत असलेल्या नागरिकांनी टोपी किंवा छत्री वापरा आणि डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायांवर ओलसर कापड वापरावे. ओआरएस, नारळ पाणी, घरगुती पेये म्हणजे लस्सी, तोरणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक इत्यादींचा वापर करावा. जे शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत करतात असे सांगितले आहे.

त्याचप्रमाणे स्वयंपाकाचा भाग पुरेसा हवेशीर करण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघडाव्यात. एखाद्याला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्यावी. पाळीव जनावरांना सावलीत ठेवावे आणि त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे. छतावर, बाल्कनीमध्ये लहान कुंड्यांमध्ये पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी ठेवावे. नागरिकांनी आपले घर थंड ठेवावे, पडदे, शटर किंवा सनशेड यांचा वापर करावा आणि रात्री खिडक्या खुल्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे वापरावेत आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करावी. कामाच्या ठिकाणी पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करून ठेवावे. थेट सूर्यप्रकाश टाळण्यासाठी कामगारांना सावध करावे असे सांगून दिवसाच्या थंडवेळी कामाची वेळ ठरवा. बाह्य कामासाठी विश्रांतीची गरज वाढवा. गर्भवती कामगारांना आणि आजारी असलेल्या इतरांना अतिरिक्त विश्रांती देण्याचे आवाहन केले आहे.

काय टाळावे?
दरम्यान, खात्याने या उष्णतेच्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी काय करू नये किंवा काय टाळावे याबाबत काही सूचना केल्या आहेत. त्यामध्ये पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना ठेऊ नये. उन्हात विशेषतः दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत बाहेर जाणे टाळावे. गडद, जड किंवा घट्ट कपडे घालणे टाळावे. जेव्हा बाहेरचे तापमान जास्त असते तेव्हा जड कामे टाळावीत. घाईगर्दीच्या वेळी स्वयंपाक करणे टाळावे. अल्कोहोल, चहा, कॉङ्गी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळावीत. ज्यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते. उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळावे आणि मुख्य अन्न खाऊ नये अशा सूचना केल्या आहेत.