निवडणूक नियमावलीत केलेल्या दुरुस्तीनुसार येत्या गोवा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना २० लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च करता येणार नाही.
वरील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्था केली आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास उमेदवाराला निवडणुकीपासून अपात्र ठरविले जाईल.
निवडणुकीची घोषणा बुधवारी?
गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख उद्या बुधवार दि. ४ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही अती महत्वाच्या म्हणजे प्राधान्य असलेल्या फाईलीच आपल्या कार्यालयात पाठविण्यास संबंधित अधिकार्यांना सांगितले आहे. निवडणूक काळात कामाचे प्रमाण कमीच असावे, असे आपल्याला वाटते. सद्या उमेदवार निवडीची प्रक्रिया चालू आहे, सरकारने केलेल्या कामांची जनता पावती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.