उमेदवारांची यादी भाजपकडून जाहीर

0
31

भाजपने पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याआधीच केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेऊन मध्य प्रदेश व छत्तीसगढमधील अनुक्रमे 39 व 21 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. डिसेंबरपर्यंत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निर्धारित प्रक्रिया होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बुधवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा करण्यात आली व त्यानंतर चोवीस तासांच्या आत मध्य प्रदेश व छत्तीसगढमधील उमेदवारांची पहिली यादी घोषित केली गेली.