उपराष्ट्रपती जगदीप धनखड (73) यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांना अस्वस्थता आणि छातीत दुखण्याची तक्रार होती. त्यानंतर, रविवारी पहाटे 2 वाजता त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. ते सध्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा स्वतः एम्समध्ये त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एम्स रुग्णालयात भेट दिली आणि उपराष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.