उन्नावमध्ये ट्रक-बस अपघात, 7 जणांचा मृत्यू

0
13

उत्तर प्रदेशमदील उन्नाव येथे काल रविवारी दुपारी झालेल्या भीषण बस अपघातात सातजणांचा मृत्यू झाला असून 25 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. ट्रक आणि बसच्या समोरासमोर झालेल्या या अपघातात बस एका बाजूने कापून निघाली. बांगरमऊ येथून उन्नावकडे जात असलेल्या या खासगी बसला हा अपघात झाला. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बसला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडकेनंतर बसला एका बाजूने ट्रकने कापत नेले. जखमी आणि मृत लोक बसच्या फाटलेल्या बाजूने लटकत होते. घटनेनंतर ट्रक चालक पळून गेला.