उद्यापासून 15 फेब्रुवारीपर्यंत जुना मांडवी पूल राहणार बंद

0
3

पणजी येथील राष्ट्रीय महामार्ग 66 वरील जुना मांडवी पूल येत्या 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात दुरुस्तीच्या कारणास्तव सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जुना मांडवी पूल बंदच्या काळात वाहनांची वाहतूक नवीन मांडवी पुलावरून वळविण्यात येणार आहे, असे वाहतूक पोलीस विभागाने कळविले आहे. जुना मांडवी पूल बंद ठेवण्याबाबतची सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग 7 च्या (राष्ट्रीय महामार्ग) कार्यकारी अभियंत्यांनी जारी केली आहे.