उद्ध्वस्त मंदिरे, वास्तू, स्थळांची माहिती द्या

0
21

>> पुरातत्त्व खात्याचे नागरिकांना आवाहन

राज्यात पोर्तुगीज कालखंडात उद्ध्वस्त करण्यात आलेली मंदिरे, ऐतिहासिक स्थळे आणि वास्तूंची माहिती सादर करण्याचे आवाहन राज्य पुराभिलेख, पुरातत्त्व खात्याने नागरिकांना केले आहे.
राज्याच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात राज्यातील पोर्तुगीज कालखंडात उद्ध्वस्त करण्यात आलेली मंदिरे, वारसा स्थळांच्या पुनर्बांधणीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पोर्तुगीज कालखंडात उद्ध्वस्त करण्यात आलेल्या पुरातन वास्तू, मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी पुराभिलेख, पुरातत्त्व खात्याने पाऊल उचलले आहे. राज्यातील सरकारी यंत्रणेकडे पोर्तुगीज कालखंडात उद्ध्वस्त करण्यात आलेल्या मंदिर, वारसा स्थळांबाबत सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांचे साहाय्य घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्थांनी उद्ध्वस्त करण्यात आलेली मंदिरे, वारसा स्थळाबाबत माहिती येत्या ३१ नोव्हेंबरपर्यंत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील उद्ध्वस्त मंदिरे, वारसा स्थळांबाबत माहिती मिळविण्यासाठी जाहिरातींच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी मंदिरे, वारसा स्थळाबाबत माहिती सादर करताना आवश्यक दस्तऐवज, छायाचित्रे सादर करावी, असे आवाहन पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले आहे.