>> परिसरातील 25 हजार लोक नजरकैदेत
उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये 185 वर्षे जुन्या नूरी मशिदीचे अतिक्रमण पाडण्यात आले. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी 5 बुलडोझद्वारे तब्बल 7 तास अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. यावेळी नूरी मशिदीचा काही भागही पाडण्यात आला.
या काळात लालौली शहरातील 25,000 लोकांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 500 मीटरचा परिसर सील करण्यात आला. कोणाला येण्या-जाण्याची परवानगी नव्हती. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे परिसरावर नजर ठेवण्यात आली होती. सकाळी आठ वाजता सुरू झालेली कारवाई दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती. यानंतर अतिक्रमणाचा डेब्रिज हटवण्यात आला.
सुमारे 6 तासांनंतर बांदा-कानपूर मार्ग पुन्हा खुला करण्यात आला. घटनास्थळी डीएसपींसह अनेक पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
बांदा-बहराइच महामार्गाचे बिंदकी ते फतेहपूरमधील बांदापर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. हायवेच्या वाटेवर नूरी मशीदही येते. बांधका मखात्यान्े 17 ऑगस्ट रोजी मशीद समितीला नोटीस पाठवली होती. बेकायदा अतिक्रमण काढण्यासाठी समितीने एक महिन्याची मुदत मागितली होती, मात्र समितीने अतिक्रमण काढले नाही.
त्याऐवजी मशीद समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 1839 मध्ये मशीद बांधण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. आम्ही कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. या प्रकरणी 6 डिसेंबरला सुनावणी होणार होती, मात्र सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता 13 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.