उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात ६० टक्के मतदान

0
23

उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ५८ जागांसाठी ६०.५१ टक्के मतदान झाले. ११ जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघांमधील ६२३ जणांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. मतदानावेळी नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.

उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ जागांसाठी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया ७ टप्प्यात पार पडणार आहे. त्यातील पहिला टप्पा काल पार पडला. पहिल्या टप्प्यात शामली, हापुड, गौतमबुद्ध नगर, मुजफ्फरनगर, मेरठ, बागपत, गाजियाबाद, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा या जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. सर्वाधिक मतदान कैरानामध्ये झाले असून, तेथे ६५.३ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी मतदान साहिबाबादमध्ये झाले असून, तेथे ३८ टक्के मतदान नोंदवले गेले.