काणकोण समुद्रात पिंजरे लावून मासळी पैदास करण्याच्या योजना यशस्वी झाल्याने आता उत्तर गोव्यातही वरील योजना राबविण्याचे सरकारने ठरविले आहे, अशी माहिती मच्छीमारी खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.समुद्राबरोबरच नदीच्या पाण्यातही पिंजरे लावून मासळी पैदास करण्याचा विचार अधिकार्यांनी व्यक्त केला. या प्रस्तावास केंद्राने मान्यता दिली असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेखाली आर्थिक मदत मिळेल, असे अधिकार्यांनी सांगितले.
उत्तर गोव्याबरोबर दक्षिण गोव्यातील भागांतही मासळी पैदास करण्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी सध्या सर्वेक्षण चालू आहे. चार ते पाच महिन्यांच्या काळात प्रती पिंजर्यात किमान चारटन मासळी पैदास करणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. काणकोण येथे चणाक व मोडसो या जातीच्या मासळीची पैदास केली होती, अन्य जातींच्या मासळीचीही पैदास करण्याचा विचार अधिकार्यांनी व्यक्त केला.