उत्तरेत ध्वनिप्रदूषण; बैठक घेणार : सिक्वेरा

0
10

उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात कणकर्कश संगीताची समस्या सोडवण्यासाठी विविध सरकारी खात्यांत समन्वयाची आवश्यकता असून, या समस्येवर चर्चा करण्यासाठी संबंधित खात्यांची एक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती काल पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिली. या समस्येवर तोडगा काढायचा झाल्यास ही बैठक होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, उत्तर गोव्यातील किनारी भागात, विशेषत: हणजूण व वागातोरमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या संगीतरजनींमुळे या परिसरातील लोकांना ध्वनिप्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर तेथील लोकांनी त्याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक लोकांनी काल सलग दुसऱ्या दिवशी ध्वनिप्रदूषणाविरोधात पोलीस स्थानकात धाव घेऊन संगीतरजनी बंद करण्याची मागणी पोलिसांकडे केली.