उत्तराखंडमधील चामोली, पिठोरगड, बस्ताडिया जिल्ह्यांत झालेल्या ढगफुटीमुळे आतापर्यंत ३० जणांचा बळी गेला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक घरे वाहून गेली असून, अनेक लोक बेपत्ता आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. ढगफुटीचा सर्वाधिक फटका चामोली जिल्ह्याला बसला आहे. येथील दोन घरे मंदाकिनी नदीमध्ये वाहून गेली आहेत. पिठोरगड व बस्ताडियामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.