उत्तराखंडमधील हिमस्खलनात आतापर्यंत आठजणांचा मृत्यू

0
2

उत्तराखंडमधील चमोली येथे 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या हिमस्खलनात आतापर्यंत आठ कामगारांचा मृत्यू झाला. यापैकी चार जणांचा बचावकार्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर रविवारी चार मृतदेह बाहेर काढण्यात आले. 46 कामगारांना सुखरूप वाचवण्यात आले.

शुक्रवारी, अपघाताच्या दुसऱ्या दिवशी, 17 लोकांना बाहेर काढण्यात आले. शनिवारी 33 लोकांना बाहेर काढण्यात आले. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला होता. दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:15 वाजता चमोलीच्या माना गावात हा अपघात झाला. मोली-बद्रीनाथ महामार्गावरील एका कंटेनर हाऊसमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन चे कामगार राहत होते, तेव्हा बर्फाचा डोंगर घसरला. सर्व कामगार त्याखाली दाबले गेले.

सुटका करण्यात आलेल्या 46 कामगारांना जोशीमठ येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ऋषिकेश एम्समध्ये रेफर करण्यात आले. जोशीमठ आर्मी इस्पितळात डॉक्टरांची एक टीम 44 कामगारांवर उपचार करत आहे.