उत्तराखंडचे दहावे मुख्यमंत्री म्हणून काल भाजपचे खासदार तीरथसिंह रावत यांनी शपथ घेतली. राज्यपाल बेबी रानी मौर्य यांनी त्यांना शपथ दिली. यापूर्वी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांची एकमताने विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. तीरथसिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करताना, आपल्याला प्रशासकीय आणि संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव आहे. आपल्या नेतृत्वात राज्याची आणखी प्रगती होईल, यावर माझा विश्वास असल्याचे म्हटले आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. रावत यांनी, मी सर्वांना सोबत घेऊन पुढे चालेन. मुख्यमंत्री पदाची जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करेन असे सांगितले.