>> उच्च न्यायालयात सरकारची माहिती
राज्यातील बेकायदा रेती उत्खनन प्रकरणातील सुमारे ३९८ क्युबिक मीटर रेती गुरुवारपर्यंत पुन्हा नदीच्या पात्रात टाकण्यात आली आहे, अशी माहिती सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काल दिली.
राज्यातील बेकायदा रेती उत्खनन प्रकरणी सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने सरकारने बेकायदा रेती प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले आहेत. रेती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणार्या होड्या जप्त करून नष्ट करण्याची सूचना केली आहे. तसेच बेकायदा उत्खनन करण्यात येणारी रेती पुन्हा नदीच्या पात्रात टाकण्याचा आदेश दिला आहे.
न्यायालयाच्या रेती उत्खननाविरोधातील आदेशाचे पालन केले जात नसल्याने गोवा रिव्हर सँड प्रोटेक्टर्स नेटवर्क संघटनेने एक अवमान याचिका दाखल खंडपीठात दाखल केली आहे. या याचिकेच्या पार्श्वभूमीवर सरकार यंत्रणा खडबडून जागी झाली असून बेकायदा रेती उत्खनन प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. सरकारी यंत्रणेने सद्यःस्थिती अहवाल सादर करण्याचा निर्देश न्यायालयाने दिला आहे.