उच्च सुरक्षा क्रमांक पट्टीसाठी आवश्यक वेळ देणार ः गुदिन्हो

0
254

वाहनचालकांना उच्च सुरक्षा क्रमांक पट्‌ट्या बसवण्यासाठी आवश्यक तेवढा अवधी दिला जाणार आहे. त्याबाबत कुणीही काळजी अथवा चिंता करू नये, असे काल वाहतूक खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. वाहन मालकांना त्यांच्या नव्या वाहनांसाठीचा परवानाही खाते विनाविलंब देणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, राज्यातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती जोपर्यंत केली जाणार नाही तोपर्यंत वाहतूक खात्यातर्फे नव्या मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नसल्याचे गुदिन्हो म्हणाले.

वाहतूक खात्याने उच्च सुरक्षा क्रमांक पट्‌ट्या बसवण्यासाठीचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिलेले आहे त्या कंत्राटदाराने या क्रमांकपट्‌ट्या बसवण्यासाठी आवश्यक सोय न कल्याने वाहनचालकांचे हाल होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला होता.