उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ ३ मे ते ७ जूनपर्यंत कार्यरत

0
253

बई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ ३ मे ते ७ जून दरम्यानच्या उन्हाळी सुट्टीत कार्यरत राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि सलग्न खंडपीठे उन्हाळी सुट्टीत कार्यरत राहणार असल्याची माहिती रजिस्ट्रार जनरल एस. बी. अगरवाल यांनी एका परिपत्रकातून दिली आहे. गोवा खंडपीठाचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २.३० पर्यतअर्ध्या तासाच्या सुट्टीसह चालणार आहे. खंडपीठातील ज्येष्ठ न्यायाधीश आपले सहकारी व बार मेंबर यांच्याशी चर्चा करून वेळेत आवश्यक बदल करू शकतात, असे परिपत्रकात म्हटले आहे.