देशभरात उघड्यावर कचरा जाळण्यास संपूर्णतः बंदी घालणारा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. अशा प्रकारे कचरा जाळला गेल्यास पंचवीस हजारांचा दंड ठोठावला जाईल. कचरा साठवण्याच्या ठिकाणासह कोठेही उघड्यावर कचरा जाळला जात असल्यास अशा प्रत्येक प्रकरणात उल्लंघन करणार्या व्यक्ती वा संस्थेस दंड भरावा लागेल.