उगवे येथे स्वयंअपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू

0
3

उगवे पेडणे येथे माऊली मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर बुलेटच्या (जीए 11 0285) झालेल्या स्वयं अपघातात गुडे शिवोली येथील श्रद्धेश सुदेश नार्वेकर (29) या पेडणे येथील पशू वैद्यकीय कार्यालयात डॉक्टर म्हणून सेवा बजावणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर बुलेटवर त्याच्या मागे बसलेला त्यांच्या आत्याचा मुलगा विशाल गोरक्षनाथ मोटे (32) हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्या पायाला तसेच डोक्यालाही इजा झाली.

पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पेडणे येथे पशुचिकित्सा कार्यालयात पशूंचे डॉक्टर म्हणून सेवा बजावणारे श्रद्धेश व त्यांचा आतेभाऊ विशाल हे दोघे तोरसे येते जात होते. रात्री उशिरा सुमारे 2.10 च्या दरम्यान उगवे येथे पोचले असता त्यांना डुलकी आल्याने त्याची बुलेट दुभाजकाला आदळली. त्यामुळे झालेल्या अपघातात श्रद्धेश नार्वेकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 108 रुग्णवाहिकेतून त्यांना इस्पितळात नेले. मात्र श्रद्धेश यांचा अगोदरच मृत्यू झाला होता. श्रद्धेश नार्वेकर हे विवाहित असून त्यांची पत्नी गरोदर आहे.