ईशाच्या ड्रग्स सेवनाविषयी कसून चौकशी व्हावी : कॉंग्रेस

0
228

स्वत:हून घेतले की कोणी दिले?
कांदोळी येथील सुपरसोनिक नृत्य महोत्सवात मृत झालेली ईशा मंत्री हिने स्वत:हून अमली पदार्थांचे सेवन केले होते किंवा अन्य कोणी त्याना ते दिले की काय याची चौकशी करण्याची मागणी प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधीचे पत्र अमली पदार्थ विरोधी विभागाच्या पोलीस अधिक्षकांना पाठवले आहे.ईशाचा ऑटोप्सी अहवाल कशा पद्धतीने तयार केला, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वरील अहवाल तयार करतेवेळी राजकारण्यांनीही हस्तक्षेप केल्याचा संशय कवठणकर यानी पोलीस अधिक्षकांना सादर केलेल्या पत्रात व्यक्त केला आहे. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यानी युवतीने मद्य प्राशन केले होते, असे विधान केलेले आहे. ईशाच्या मृत्यूचे कारण दडपविण्यासाठीच त्यानी हे विधान केल्याचे कवठणकर यांनी म्हटले आहे. संबंधितांना ताबडतोब अटक करून मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.