- प्रज्वलिता प्र. गाडगीळ
त्यांना कळून चुकले- आपल्या जीवनात काही नाही, कुणीही आपले नाही. ह्या आजाराने आपले डोळे उघडले आणि एक संधी दिली. जोपर्यंत स्वार्थ आहे, तोपर्यंत सर्व आमचे आहेत.
गावात, शहरात खूप डॉक्टर्स आहेत, होते आणि असणार. हे डॉक्टर्स कुणाला कोणता आजार झाला याचे अचूक निदान करुन पेशंटला योग्य उपचार देतील आणि देतातही. डॉक्टर म्हणजे लोकांसाठीच जास्त आणि ते त्यांचे खास करुन कर्तव्यसुद्धा आहे. तर मी आज एका खेड्यातल्या डॉ. विषयी लेख लिहितेय. एका खेड्यात एक डॉ. राहत होते. ते डॉ. स्पेशालिस्ट होते. त्यांना पेशंटचं तोंड पाहताच कोणता आजार असेल हे अचूक समजायचं. असेच त्यांचे व्यवस्थित चालले होते. एके दिवशी एका माणसाला रस्त्यावरुन जाताना पाहिले व त्याला घरात बोलावले व सांगितले, ‘रागावू नकोस हं, तुला मोठा आजार आहे. यावर मी तुला एक औषध देईन. ते तू नीट घे, आणि काय सांगतो ते नीट ऐक. याने तुझा आजार पळून जाईल’. जर याने डॉक्टरांचं औषध नाही घेतलं तर डॉ.चं काहीही नुकसान नव्हते. पण यांना दैवी शक्ती थोडी होती. म्हणूनच रस्त्याने जाताना बोेलावून औषध दिलं. तो बरा व्हावा हीच इच्छा होती. अशाच तर्हेने आमचे गोंदवलेकर महाराज सांगतात, ‘तुम्ही काहीच करु नका. पण नाम घ्या’. हे आम्हाला का सांगतात तर आमचा उद्धार व्हावा आणि पुनरपी जननम् पुनरपी मरणम्…’ होऊ नये म्हणून!
तर सांगत होते काय, तर पेशंटला कसे बरे पटेल? हे त्याला पटले नाही. हे मला घरात बोलावून औषध दिले, पथ्य पाळायला सांगितले, त्याला त्याचा अर्थच कळेना. म्हणतात ना फुकट्याला किंमत नसते ते असं. भगवंताने नाम फुकट ठेवले आहे, श्वास फुकट ठेवले आहेत त्याची किंमत मानवाला केव्हा कळणार? हा पेशंट घरी गेला आणि घरात सर्वांना डॉक्टरांसोबत घडलेला प्रकार त्यांना सांगितला. मग मात्र परिवारातील सदस्यांना भीती वाटू लागली. मग यांच्याकडे सर्वजण वेगवेगळ्या नजरेने पाहू लागले. त्याचं जेवण, अंथरुण, रुम सगळं वेगळ्या रुमात. त्याला वाळीत टाकण्यात आले. सकाळी एकदम स्वस्थ होता आणि मग बघता बघता ताप आला. आधी डोकं भडकलेलं आणि त्यात खरोखरच भरभरुन ताप अंगात शिरला. मग स्वतःच नंबर डायल केला. गाडी आली, आणि काय ही गाडी पाहताच बातमी वार्यासारखी पसरली. चर्चा गुपचूप करीत होते. पेशंटच्या डोळ्यात अश्रूंची धारच लागली. त्याला वाटलं हे कदाचित शेवटचं दर्शन घेतोय घराचं, आपल्या परिवाराचं आणि गावातील लोकांचं. मनोमनी नमस्कार केला आणि बसला गाडीत. मग त्याच्या डोक्यात विचाराचं काहूर माजले. गाडी सुरू होण्याआधी घरातील नोकरांनी डेटॉल आणि पाणी ओतले. कुत्र्यानं तर रडायलाच सुरुवात केली. म्हणतात ना ‘‘कुत्रा रडणे’’ म्हणजे अशुभ मानले जाते. तो ईमानदार मानला जातो आणि खरोखरच तो त्यांच्यामागे धावला देखील, पण घरातील लोक मात्र घरातूनच टाटा करत होते. मग हॉस्पिटलमध्ये गाडी पोचली. त्यांच्यावर वेगवेगळी ट्रीटमेंट सुरु झाली. ताप चढत होता, उतरत होता. घरातील लोक डॉक्टरांकडे चौकशी नेहमीच करत होते. पण बघायला मात्र नाही आले. घरात सर्व सुखं होती. गाडी, बंगला, पैसा, माणसे, प्रेमाची बायको, सूना, नातवंडे, सर्व सुखं होती. पण प्रत्येक माणूस स्वतःला फार जपतो. खरं हे केव्हा कळतं, तर प्रसंगावरुनच. मी.. माझं.. मला… करत बसतो, पण दुनिया झूट आहे. अहो ह्या पेशंटला फार मोठी नोकरी होती. रिटायर्ड तो. पेन्शनच येते साठ हजार! जेव्हा त्याला ताप आला तेव्हा त्याची किंमत शुन्य. असो. ह्यात त्यांचा इमानदार मात्र सच्चा निघाला, तो तेव्हापासून घरात आलाच नाही. फक्त हॉस्पिटलजवळ बसून आपल्या धन्याची वाट बघत असे. खरं तर त्याच्या धन्याला टायफाईड झाला होता. पण कोरोनाच्या भयाने सर्व आप्त मंडळी भयभित झाली होती. तो पेशंट २० दिवसांनी बराही झाला. मग घरच्यांना कळवण्यात आले की, ह्याला उद्या सुट्टी देण्यात येईल तुम्ही न्यायला या. पेशंट म्हणाला, ‘माझं विघ्न टळलं?’
‘हो हो, तुम्ही एकदम बरे झालात, पण सांभाळा स्वतःला’. मग घरातील लोक आलिशान गाडी घेऊन आले न्यायला, त्याबरोबर पेशंट बाहेर आला. तोच कुत्र्याने त्यांच्यावर झडप घातली, जणूकाही राम आणि भरत भेट झाली त्यासारखे. मग अश्रूला बांध फुटला आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत रडत होती. मग पेशंट आणि कुत्रा दुसर्या दिशेने म्हणजेच अलिशान गाडीच्या विरुद्ध दिशेने दूर गेले ते परत कधीच नं येण्याच्या वाटेने. हे बरोबर केले कां त्यांनी? तर हो, नक्की.
फक्त ताप आल्यावर होत्याचे नव्हतं करतां?.. निदान या आजाराचं निदानतरी होऊ दे! हे प्रेम? ही माया, हा मोह, गेलं कुठे? मग पेपर वाल्यांना कळवलं.. हा गृहस्थ हरवला आहे. कृपया हा फोटो पहा. वर पत्ता वय, फोन नंबर दिला आहे. कुणाला आढळल्यास घरी आणून दिल्यास योग्य बक्षीस देण्यात येईल. मग कुणीतरी फोन केला.. ‘हे गृहस्थ भेटलेत, रक्कम काय देणार आपण?’ घरातल्यांनी विचार करुन ठरवलं की साठ हजार.
मग त्यांच्याही लक्षात आलं की घरातील काय देणार, तोच आम्हाला दर महिन्याला साठ हजार देत असे, म्हणून आमचेे घर आनंदात चाले.
मग हा जो घरातला कर्ता कुत्र्याला घेऊन गेला त्याने आपले सर्व पैसे भुकेल्या- लाचारांना, गोर-गरीब, अनाथ ह्यांना मदत करुन, पुण्य कमावले. त्यांना कळून चुकले- आपल्या जीवनात काही नाही, कुणीही आपले नाही. ह्या आजाराने आपले डोळे उघडले आणि एक संधी दिली. जोपर्यंत स्वार्थ आहे, तोपर्यंत सर्व आमचे आहेत. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही महान आहात. तुमच्यामुळेच माझ्याही जीवनात रामायण, महाभारताचं प्रत्यक्ष दर्शन घडलं. डॉक्टर, जीवन एक प्रवासच पण मृत्यू मात्र ठिकाण आहे.