दिल्लीतील द्वारका येथील घरातून शनिवारी रात्री ईडीचे बनावट अधिकारी बनून भामट्यांनी 3 कोटी रुपयांची लूट केली. पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. हे सर्वजण पोलीस बंदोबस्त तोडून कारमध्ये बसून पळत होते. पोलिसांनी त्यांचा दोन किलोमीटर पाठलाग करून त्यांना पकडले आणि लुटलेल्या रकमेतील एक कोटी रुपये जप्त केले. शनिवारी मध्यरात्री काही लोक जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले. हे सर्वजण स्वत:ला अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी असल्याचे सांगत होते. अवघ्या 30 मिनिटांत चोरट्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि 3 कोटी रुपये घेऊन निघून गेले.