भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) वर्षाच्या पहिल्या प्रक्षेपणात यश मिळवले आहे. इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून काल पहाटे ५.५९ वाजता रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट (ईओस-०४) म्हणजे पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला. हे प्रक्षेपण प्रक्षेपक वाहन पीएसएलव्ही-सी५२ द्वारे झाले आहे. यामध्ये पृथ्वी निरीक्षण उपग्रह (ईओस-०४) आणि दोन लहान उपग्रह इन्स्पायरसॅट-१ आणि आयएनएस-२टीडी यांचा समावेश आहे. ईओस-०४ हा एक रडार इमेजिंग उपग्रह आहे, जो सर्व हवामानातील पृथ्वीच्या उच्च दर्जाचे फोटो इस्रोला पाठवेल. या प्रतिमा कृषी, वनीकरण आणि वृक्षारोपण, मातीची आर्द्रता, जलविज्ञान आणि पूर मॅपिंगसाठी उपयुक्त ठरू शकतात, अशी माहिती इस्रोने दिली.