इस्रायलचे हल्ले सुरुच

0
7

इस्रायलने काल बेरुतमधील हिजबुल्लाहच्या मध्यवर्ती मुख्यालयावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यावेळी हिजबुल्लाहचा प्रमुख सय्यद हसन नस्रल्लाह मुख्यालयात हजर होता, अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय या स्फोटात 4 इमारतीही ढासळल्या. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्राला संबोधित केल्यानंतर बेरूत उपनगरात हा हल्ला झाला. बेंजामिन नेतन्याहू यांनी दहशतवादी गटाशी लढा सुरुच राहील, असे संयुक्त राष्ट्रात संबोधित केल्यानंतर हा हल्ला झाला. या स्फोटाच्या काही वेळापूर्वी, पूर्वीच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या एका वरिष्ठ कमांडरसह तीन हिजबुल्ला सदस्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपनगरात हजारो लोक जमा झाले होते.या हल्ल्यात किती जीवितहानी झाली, याबाबत माहिती समजू शकली नाही.