इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच

0
6

>> हमासचे नेते राव्ही मुश्ताहा यांच्यासह 15 जणांचा मृत्यू

इस्रायलने लेबनॉनमध्ये बिंत जेबिलसह काही स्थळांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहच्या 15 सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे. इस्रायली सैन्य म्हणजेच आय़डीएफने रात्रभऱ आपल्या लढाऊ विमानांनी जिथे हिजबुल्लाहचे दहशतवादी होते तिथे हल्ले केले असून त्या ठिकाणी मोठा शस्त्रसाठा होता असे इस्त्रायलने सांगितले. तसेच इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे डी फॅक्टो पीएम मुश्ताहा मारले गेले. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) सांगितले की, गाझा सरकारचे प्रमुख राव्ही मुश्ताहा हवाई हल्ल्यात ठार झाले आहेत. मुश्ताहा यांना हमास प्रमुख याह्या सिनवारचा उजवा हात मानले जात होते. मुश्ताहा हे गाझा पट्टीतील हमासच्या राजकीय ब्युरोचे सर्वात वरिष्ठ सदस्य मानले जात होते.

इस्रायलविरुद्धच्या अनेक मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. आयडीएफने सांगितले की, हमासच्या राजकीय ब्युरो आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख समेह अल-सिराज आणि हमास कमांडर सामी औदेह यांचाही मृत्यू झाला. इस्रायलने सुमारे 200 ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाल्याचे आयडीएफने सांगितले.
तेलाच्या किमती वाढणार?
इस्रायलवर इराणने केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्व भागात संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम तेलाच्या किमतीवर झालेला पहायला मिळत आहे. या युद्धामुळे आयात- निर्यातीवर मोठा परिणाम होणार असून अर्थव्यवस्थेला आणि व्यापार दोन्हीला फटका बसेल. तसेच तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठेत इराणकडून तेल आयात होते.