इस्पितळात डॉक्टरची गोळ्या घालून हत्या

0
6

दिल्लीत ज्या डॉक्टरांनी उपचार केले, त्याच डॉक्टरांची हत्या करण्याची घटना घडली असून हत्या करणारे आरोपी हे अल्पवयीन आहेत. गुरुवारी पहाटे दक्षिण पूर्व दिल्लीतील एका लहान नर्सिंग होममध्ये हा प्रकार घडला. डॉ. जावेद अख्तर यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गोळी घातली. 16-17 वर्षे वयोगटातील दोन मुले मध्यरात्री 1 वाजता रुग्णालयात आली. एका मुलाच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती. ड्रेसिंग केल्यानंतर दोघे डॉ. अख्तर यांच्या केबिनमध्ये प्रिस्क्रिप्शनसाठी गेले आणि त्यांनी डॉक्टरवर गोळ्या झाडल्या.