इव्हेंडर रॉड्रिगीसला पोलीस कोठडी

0
127

गुन्हा अन्वेषण विभागाने मडगाव येथील सराफ स्वप्निल वाळके यांच्या खून प्रकरणी अटक केलेल्या इव्हेंडर रॉड्रिगीस याला ९ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मडगाव येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिला.

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने इव्हेंडर याला शनिवारी अटक केली होती. गुन्हा अन्वेषण विभागाने या खून प्रकरणी आत्तापर्यंत तिघांना ताब्यात घेतलेले आहे. तर, मुख्य संशयित आरोपी मुस्तफा शेख मडगाव पोलिसांना शरण आला आहे. मडगाव पोलिसांनी या खून प्रकरणी मुस्तफा आणि ओंकार पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या खून प्रकरणाचा तपास काम मडगाव पोलिसांकडून काढून घेऊन गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.