इराणच्या केरमन शहरात काल बुधवारी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांत 103 जणांचा मृत्यू झाला असून या घटनेत 170 हून अधिक जखमी झाले आहेत. माजी रिव्होल्युशनरी गार्ड्स (इराणी लष्कर) जनरल कासिम सुलेमानी यांच्या समाधीवर हे स्फोट झाले. पोलिसांनी हा आत्मघाती हल्ला होता असे म्हटले आहे.
इराणच्या केरमन शहरात बुधवारी झालेल्या दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटात 103 जणांचा मृत्यू झाला आहे तर 170 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या कुड्स फोर्स प्रमुख इराणचे माजी लष्कर जनरल कासिम सुलेमानी यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांच्या समाधीच्या ठिकाणी लोक जमले होते. त्यावेळी हे स्फोट झाले.
कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूला चार वर्षे झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या समाधीच्या ठिकाणी अनेक लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी जमा झाले होते. त्याचवेळी हे बॉम्बस्फोट झाले. 2020 मध्ये बगदादमध्ये अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता.
चेंगराचेंगरीत अनेक जखमी
जमावामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेकजण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी मोठ्या संख्येने रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. सुलेमानीच्या मृत्यूच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित समारंभासाठी परिसरात गर्दी जमली होती. सुलेमानी यांनी दोन दशकांहून अधिक काळ इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सची विदेशी ऑपरेशन्स शाखा असलेल्या कुड्स फोर्सचे नेतृत्व केले.
अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानीचा मृत्यू
इराणमध्ये सुलेमानीला नॅशनल हिरो समजले जाते. इराणमधील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव होते. 3 जानेवारी 2020 रोजी सुलेमानी यांनी सीरियाला भेट दिली. तेथून ते इराकची राजधानी बगदादला गेले. या दौऱ्याची माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएला मिळाली होती. सुलेमानीची कार विमानतळावरून बाहेर पडताच रात्रीच्या अंधारात अमेरिकन एमक्यू-9 ड्रोनने त्यावर क्षेपणास्त्र डागले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 2019 मध्ये इराणने अमेरिकेसोबतच्या अणू करारातून माघार घेतल्यानंतर ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली होती. तेव्हा कासिमनी प्रत्युत्तर देताना ट्रम्प यांनी हे युद्ध सुरू केले आहे, आता आम्ही ते संपवू असे म्हटले होते.