इराणचा इस्रायलच्या रुग्णालय, स्टॉक मार्केट इमारतीवर हल्ला

0
5

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायल यांच्यात संघर्ष सुरू असून. यादरम्यान दक्षिण इस्त्रायलमधील सोरोका मेडिकल सेंटरवर गुरुवारी पहाटे इराणने क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण जखमी झाले. याशिवाय तेल अवीव शहरातील इस्रायलच्या स्टॉक मार्केट इमारतीवरही इराणने केला, त्यात इमारतीचे मोठे नुकसान झाले; मात्र या हल्ल्यानंतरही इस्त्रायली स्टॉक मार्केटमध्ये तेजी दिसून आली. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये किमान 47 लोक जखमी झाले आहेत. सोरोका मेडिकल सेंटर हे इस्त्रायलच्या दक्षिणेकडील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या संदर्भात एक व्हिडीओ इस्त्रायलच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये रुग्णालयातील कर्मचारी रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये धुरामधून पळताना दिसत आहेत. तसेच खिडक्या फुटून जमिनीवर पडलेल्या काचा, तुटलेले बाकडे, खुर्च्या सर्वत्र विखरल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतर कर्मचारी आणि रुग्ण आरडाओरड करताना पाहायला मिळत आहेत.