इराकमध्ये बंडखोरांवर अमेरिकेचे हवाई हल्ले

0
237

अमेरिकेच्या लष्कराने कालपासून इराकमध्ये इस्लामी बंडखोरांवर हवाई हल्ले सुरू केले. इर्बिल शहरात जेथे अमेरिकेच्या दूतांचे वास्तव्य आहे, तेथे पोचण्यापासून बंडखोरांना रोखण्यासाठी त्यांच्या फिरत्या तोफांवर बॉम्ब टाकण्यात आले.
अमेरिकेच्या दोन विमानांनी लेझरआधारित बॉम्ब इर्बिलनजीक फिरत्या तोफखान्यावर टाकले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी परवा हवाई हल्ल्यांना मान्यता दिली होती. त्यानंी म्हटले होते की, अमेरिकेच्या लोकांना धोका निर्माण झाला तर थेट कारवाई केली जाईल. मात्र पूर्वीप्रमाणे अमेरिकी लष्कराला इराकमध्ये युद्धात लोटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, इराकी सैन्याला मदतीसाठीही असे हल्ले करण्यात येऊ शकतात असे अमेरिकी प्रशासनाने म्हटले आहे.
इराकमध्ये आयएसआयएल दहशतवाद्यांनी इराकमध्ये सरकारला मोठे आव्हान उभे केले असून अनेक महत्त्वाची शहरे काबिज केली आहेत.