पाकिस्तानच्या मुलतान शहरात आयोजित विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्या कालच्या एका जाहीर मेळाव्यात चेंगराचेंगरी होऊन ८ जण मरण पावले व ४० जण जखमी झाले.पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी धसास लावण्यासाठी तेहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी हजारो लोकांची उपस्थिती होती. खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला. सभेच्या ठिकाणच्या ती गेटस् बंद केल्याने हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे.