सध्या भारत-पाक नियंत्रण रेषेनजीक चालू असलेली युध्दसदृश्य स्थिती हाताळण्यासाठी पाकिस्तानला चांगल्या नेत्याची गरज असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचे विरोधी पक्ष नेते इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे. विद्यमान पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडून अपेक्षित कृती होणे शक्य नसल्याचे खान यांनी म्हटले आहे. शरीफ गप्प का आहेत असा सवाल करून आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी नियंत्रण रेषेवरील समस्येसंदर्भात त्यांनी मौन बाळगल्याचा आरोप त्यांनी केला.