इमारत बांधकाम नियम दुरुस्तीचा प्रस्ताव तयार

0
14

>> सूचना व हरकतींसाठी मसुदा खुला

नगर आणि नियोजन खात्याने गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम नियमन कायद्यांतर्गत नियमांमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाचा मसुदा सूचना आणि हरकतीसाठी खुला करण्यात आला आहे. येत्या 30 दिवसांत या दुरुस्ती मसुद्याबाबत सूचना, हरकती सादर करण्याची सूचना नगर नियोजन खात्याने एका जाहीर नोटीसद्वारे काल केली आहे.

मसुदा अधिसूचनेमध्ये कृषी संशोधन, क्रीडा आणि धार्मिक मैदाने आणि योग केंद्रे, कृषी, फळबागा आणि नैसर्गिक राखीव जमिनी यासारख्या विशिष्ट उद्देशांसाठी बांधकामांना परवानगी देण्यासाठी कायद्यात सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. या मसुद्यावरील आक्षेप किंवा सूचना मुख्य नगर नियोजक (प्रशासन), नगर नियोजन खाते, दुसरा मजला, धेंम्पो टॉवर, पाटो प्लाझा, पणजी, गोवा यांच्याकडे 30 दिवसांच्या कालावधीच्या आत पाठवाव्यात. मसुदा विनियमनांच्या अंतिमीकरणाच्या वेळी सूचना, आक्षेप विचारात घेतल्या जातील. 30 दिवसांच्या कालावधीनंतर मसुदा नियमन सरकार विचारात घेईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.