इफ्फी बैठकीत महत्वाचे निर्णय

0
87

येत्या २० नोव्हेंबरपासून होणार्‍या इफ्फी महोत्सवास आता अवघे २७ दिवस बाकी राहिल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल इफ्फीसाठीच्या उच्च स्तरीय समितीची नवी दिल्लीत बैठक झाली.
इफ्फीसाठीच्या सर्व विषयांवर या बैठकीत चर्चा झाली व महत्त्वाच्या विषयांवर निर्णयही घेण्यात आल्याचे गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. मात्र, घेण्यात आलेल्या सर्व निर्णयांविषयी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व आपण पुढील आठवड्यात गोव्यात पत्रकार परिषदेतून माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.
वरील बैठकीला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, चित्रपट महोत्सव संचालनालयाचे संचालक शंकर मोहन, उपसंचालक प्रशांत कुमार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव पवन सिंग, संचालक निरुपमा कोत्रे, ईएसजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सातार्डेकर, उपाध्यक्ष दामू नाईक, तसेच आर्ट डायरेक्टर सुशांत तारी आदी मंडळी या बैठकीला उपस्थित होती.