इफ्फी निविदा प्रक्रियेत  घोटाळा : कॉंग्रेस

0
103

दक्षता खात्याकडे तक्रार
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून सर्व निविदांची चौकशी करण्याची मागणी करणारी तक्रार आपण दक्षता खात्यात सादर केल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेसचे आयोजन सचिव तथा आयटी विभागाचे अध्यक्ष दुर्गादास कामत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पदाधिकार्‍यांच्या मित्रांना कंत्राटे देणे शक्य न झाल्याने करमणूक सोसायटीने निविदा रद्द करण्याच्या घटना घडल्या आहेत. वरील प्रकरणी आवश्यक ते पुरावे असून दक्षता खात्याने विचारल्यास ते सादर करण्याची तयारी असल्याचे कामत यांनी सांगितले.