इफ्फी : आढाव्यासाठी ११ रोजी संचालनालयाचे शिष्टमंडळ गोव्यात

0
95

इफ्फी केवळ १५ दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्‍वभूमीवर इफ्फीसाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच त्यासाठीच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्यासाठी चित्रपट महोत्सव संचालनालयाचे एक उच्चस्तरीय पथक येत्या ११ नोव्हेंबर रोजी गोव्यात दाखल होत आहे. चित्रपट महोत्सव संचालनालयाचे संचालक शंकर मोहन यांच्या नेतृत्वाखाली हे पथक गोव्यात येणार असून त्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील काही अधिकारीही असतील, अशी माहिती काल गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष दामोदर नाईक यांनी दिली. आठवडाभरापूर्वी नवी दिल्लीत इफ्फीसाठीच्या उच्चस्तरीय समितीची एक महत्वाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीला चित्रपट महोत्सव संचालनालय, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय व गोवा मनोरंजन सोसायटीच्या कार्यकारी समितीतील सदस्य हजर होते.