आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ट्रॅव्हल एजंट नियुक्त करण्याच्या प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप करून त्याची चौकशी न केल्यास पुढील चार दिवसांत न्यायालयात जाणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेसचे आयोजन सचिव दुर्गादास कामत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.गोवा मनोरंजन संस्थेचे पुरुषोत्तम भगवान ऍण्ड असोसिएट्स या कंपनीची गैरमार्गाने ट्रॅव्हल एजंट म्हणून नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. दराच्या बाबतीत या कंपनीने घोटाळा केल्याचे कामत यांनी सांगितले. ज्या आंतरराष्ट्रीय कलाकारांसाठी तिकीटांचे आरक्षण केले आहे. त्यांचा व्हिजा व इमिग्रेशनचे दाखले तपासण्याची मागणीही त्यांनी केली.